नौपाड्यातील ब्राह्मण सोसायटीत पहिल्या मजल्यावरील घरात धाडसी चोरी

इमारत दुरूस्तीसाठी उभारण्यात आलेल्या परांचीवरून चढून अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील घरात धाडसी चोरी केल्याचा प्रकार नौपाड्यातील ब्राह्मण सोसायटीत घडला. चोरट्यांनी घरातील २० हजारांच्या रोकडसह तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबवला. नौपाड्यातील हिंदू कॉलनीमध्ये अनमोल हाईटस् या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असल्यानं बाबूंची परांची बांधण्यात आली आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणा-या एका गृहिणीच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास बांबूच्या परांचीवरून चढून खिडकीच्या लोखंडी ग्रील कापून चोरटा आत शिरला. चोरट्याने खोलीचा दरवाजा उघडून आतून बंद करून कपाटातील रोकडसह २ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading