नाविन्यपूर्ण फ्लॅशमॉबच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

नाविन्यपूर्ण फ्लॅशमॉबच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. ठाण्यातील विवियाना मॉल येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच झालेल्या नाविन्यपूर्ण फ्लॅशमॉबद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. मॉलमध्ये होत असलेले नागरिकांची गर्दी लक्षात घेवून जिल्हा नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी रेवती गायकर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातंर्गत 146 विधानसभा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी 29 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानादिवशी मतदानप्रक्रियेत सहभागी होवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे यासाठी या आगळा वेगळा फ्लॅशमॉब उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक गर्दीत एखाद्या गाण्यांवर ग्रुपच्या माध्यमातून नृत्य सादर केले जाते या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेवून त्यांना मतदानाचे महत्व सांगून मतदान करणेबाबत आवाहन केले जाते. हा उपक्रम ठाण्यात प्रथमच राबविण्यात आला. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असेल त्या ठिकाणी सध्या हा उपक्रम घेतला जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading