नवरात्रौत्सवाच्या मुहुर्तावर मंदिरं खुली – मात्र भाविकांची गर्दी कमी

गेल्या पावणे दोन वर्षापासून बंद असलेली मंदिरं आज भाविकांसाठी खुली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी नवरात्रौत्सवाच्या मुहुर्तावर मंदिरं खुली करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आज नवरात्राच्या मुहुर्तावर मंदिर खुली करण्यात आली. ठाण्यातील घंटाळी देवीचं मंदिर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते खुलं करण्यात आलं. ठाण्यातील बहुतांश मंदिरं खुली करण्यात आली. मात्र या मंदिरांमध्ये भक्तांची फारशी गर्दी दिसली नाही. मंदिरं खुली झाली असली तरी मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश देताना अनेक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं भाविकांची आज पहिल्या दिवशी तरी मंदिरांमध्ये गर्दी नव्हती. गोखले रस्त्यावरील हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, बाजारपेठेतील सुप्रसिध्द कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर ही मंदिरं खुली करण्यात आली पण या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी फारशी दिसली नाही. संत गजानन महाराज चौकातील गजानन महाराजांचं मंदिर मात्र आज खुलं झालं नव्हतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading