नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन

महिलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढविण्याच्या दृष्टीने नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या तर्फे परिसरातील महिलांसाठी मंगळागौरीचे पूजन आणि खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं. मनोरंजनाच्या दृष्टीने मंगळागौर खेळाला स्पर्धेचे रूप देऊन ज्या महिलांचा चांगला खेळ होईल अश्या महिलांच्या गटाला पारितोषिक दिले जाईल असे परीषा सरनाईक यांनी घोषित केले. त्याप्रमाणे मंगळागौर खेळाच्या स्पर्धेत १४ महिलांच्या गटांनी भाग घेतला. मंगळागौर खेळाच्या स्पर्धेत पहिले पारितोषिक – ऑलवेज न्यू थिंग्स ग्रुप शिवाई नगर, दुसरे पारितोषिक – येऊर ग्रुप, तिसरे पारितोषिक – लावण्यवती ग्रुप गावंडबाग तसेच विशेष पारितोषिक म्हणून श्रवण सखी – कोलशेत लोढा, न्यू लुक – शिवाई नगर, लोढा अमरा सुपर वूमन – कोलशेत यांना देण्यात आले. या कार्यक्रमात २० महिला रिक्षा चालकांना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थिती लावली होती. मंगळागौर खेळाच्या स्पर्धा हे असे एक व्यासपीठ आहे कि, जेथे सोसाटीतील सुशिक्षित महिला तसेच येऊर, कोकणी पाड्यासारख्या सामान्य घरातील काम करणाऱ्या महिलांनी एकत्र मिळून आपल्या कलेचे प्रदर्शन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading