धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नाही

गेले काही दिवस ठाणे-मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस होत असल्याचं दिसत नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस होत नसल्यामुळं ही परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची टांगती तलवार राहणार आहे. शहरामध्ये जूनपासून चांगला पाऊस झाला आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस झालेला नाही. भातसा धरणाची पातळी सध्या ११८ मीटर आहे. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ४५६ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळं धरणामध्ये सध्या अवघा ४९ टक्के पाण्याचा साठा आहे. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात २०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस असाच कायम राहिल्यास संभाव्य पाणी टंचाई दूर होऊ शकते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading