देव तारी त्याला कोण मारी – कारच्या धडकेत फरफटत जाऊनही महिला बचावली

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय ठाण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मीना नाडमीकेरी नावाच्या 40 वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक मारून सुमारे 50 मीटर अंतरापर्यत फरफटत नेल्याची घटना सिद्धांचल पवारनगर येथे घडली. अपघातानंतर महिलेची विचारपुस न करता मूजोर कारचालकाने कारसह धूम ठोकली. मात्र कारची जोरदार धडक बसुनही सुदैवाने महिला बचावली असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,चितळसर पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत. पोखरण रोड नं.2 वडारवाडी येथे राहणाऱ्या मिना नाडमीकेरी या घरकाम करणाऱ्या महिला काम आटोपुन पायी घरी जात होत्या. तेव्हा सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सिद्धाचल फेज – 6 रस्त्यावर अचानक पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक लागुन कारच्या बोनेटवर पडलेल्या मीना यांना कारचालकाने 50 मीटरपर्यत फरफटत नेले.पळुन जाताना चालकाने कार उजव्या दिशेला वळवल्याने मीना कारच्या बोनेटवरुन खाली कोसळल्या.तर,कारचालक घटनास्थळावरून कारसह पसार झाला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी मीना यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.कारची धडक बसुनही मीना यांचा जीव बचावल्याने देव तारी त्याला कोण मारी याचाच जणू प्रत्यय आला.हा सर्व प्रकार सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असुन चितळसर पोलिसांनी कारचा माग काढला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक तानाजी रोडे यांनी दिली. दरम्यान गुरूवारी सांयकाळी घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ आणखी एक अपघात घडला. भरधाव कारची धडक बसुन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading