दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा जोरात सराव सुरू

दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या जोरात सराव सुरू झाला आहे. गेली २ वर्ष कोरोना निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र कोरोना विषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे गोविंदा पथकं सध्या जोरात सराव करत आहेत. ठाण्यातील संकल्प महिला गोविंदा पथकातर्फेही असाच सराव सुरू झाला आहे. गेली २० वर्ष या गोविंदा पथकातर्फे ६० महिला या उत्सवात सहभागी होत असतात. १४ ते ६० वयोवर्षाच्या महिला या पथकात सराव करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनींपासून ते अगदी गृहिणींपर्यंत असलेल्या या पथकातील महिला सध्या चिरागनगर येथे जोरदार सराव करत आहेत. सहयोगलक्ष्मी चिरागनगर गावचं गोविंदा पथकही सध्या ८ थर लावण्यासाठी सराव करत आहे. गेली २४ वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात. १४ ते ६० वयोगटातील गोविंदा सध्या जोरात सराव करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून अभियंता, कुरियरवाले, क्रिकेटपटू असे विविध थरातील गोविंदा या पथकात सहभागी असून त्यांचा चिरागनगरमध्ये जोरात सराव सुरू आहे. हे पथक ८ थर लावणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading