दत्तजयंती निमित्त यज्ञ सप्ताह

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित मार्ग जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्तजयंती नामजप यज्ञ सप्ताह 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये के एम अग्रवाल कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरु परम पूज्य मोरेदादा यांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्य अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला. विनामूल्य प्रश्नोत्तरे, बाल संस्कार आणि युवा प्रबोधनच्या 18 सूत्री ग्राम अभियानाद्वारे मानव घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे आणि राष्ट्राचे विकास साधणे याप्रमाणे आजही कार्य सुरू आहे. श्री दत्तजयंती नामजप यज्ञ सप्ताह मध्ये सामूहिक स्वरुपात श्री गुरू चरित्र वाचन, श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ आणि रुद्र पठण सेवा होत आहेत. सप्ताहामध्ये श्री गणेश याग, गीताई याग, चंडी याग आणि श्री स्वामी याग, श्री रुद्र याग तसंच सत्यदत्त पूजन असे भव्य स्वरूपात याग आणि कार्यक्रम होत आहेत. उद्या दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या सप्ताहात के. एम. अग्रवाल कॉलेज येथे बालसंस्कार, गर्भसंस्कार आणि युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, आरोग्य आणि आर्युवेद असे विविध विषयांवर रोज सायंकाळी मार्गदर्शन आणि कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहितीसाठी ८९२८८३१६६५ आणि ७०४५८७८५४५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading