तौक्ते वादळाने हाहाकार माजवणा-या दृश्यांची ही एक झलक

ठाण्यामध्ये तौक्ते वादळाचा फारसा फटका बसला नसला तरी काही ठिकाणी त्याने हाहाकार मात्र जोरदार माजवला. तौक्ते वादळ मुंबईपासून साधारणत: दीडशे किलोमीटर अंतरावरून गेलं मात्र तरीही मुंबई-ठाण्यात त्याचा परिणाम जाणवला. ठाण्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस झाला. याबरोबरच अधूनमधून जोरदार वारा सुटत होता. यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. हरिनिवास जवळ एका होंडा सिटी कारवर झाड पडलं. या कारने डॉ. रितेश गायकवाड हे गोडबोले हॉस्पीटलमध्ये काम करणारे डॉक्टर गाडी चालवत चालले होते. पोलीस स्टेशनजवळ गाडी आल्यानंतर त्यांच्या गाडीवर झाड पडलं. म्हणतात ना देव तारी त्याला कोण तारी या म्हणीप्रमाणे गाडीवर मोठं झाड पडूनही हे डॉक्टर सुखरूप यामधून वाचले. अग्निशमन दल आणि आपत्कालीन कक्षाच्या पथकानं डॉ. गायकवाड यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. दुसरा प्रकार जांभळीनाक्याजवळ घडला. समीर आर्केडवर असणारा पत्रा वा-याच्या जोरदार रेट्यामुळे उडून मागच्या इमारतीमध्ये पडला. तर मुंब्र्यामध्ये नालं वाहू लागल्यानं नाल्यातील सर्व पाणी रस्त्यावर आलं. या पाण्याचा जोर एवढा होता की यामध्ये रिक्षाही तरंगताना दिसत होती. आज सर्वत्र झाडं पडण्याच्या घटना घडत असताना अनेक ठिकाणी जिवितहानी होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून काम करणा-या या सर्व जवानांना सलाम. ठाण्यातील या काही हाहाकार माजवणा-या दृश्यांची ही एक झलक

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading