तीन हात नाका सर्व्हीस रोडवर भरधाव गाडीचा अपघात होऊन तरूणाचा मृत्यू

तीनहात नाका येथील सर्व्हीस रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ काल रात्री भरधाव वेगाने चालवत असलेल्या गाडीचा अपघात होऊन एका तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाचपाखाडीत राहणारे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर शिवाजी गायकवाड यांचा मुलगा कल्पेश हा खाली चक्कर मारून येतो असं सांगून काल रात्री घराबाहेर गेला होता. तीन हात नाका येथील तुळजाभवानी मंदिराच्या जवळ स्कोडा कंपनीची ऑक्टिव्हिया गाडी भरधाव वेगाने चालवत मुंबईच्या दिशेने तो जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर धडकली. गाडीचा वेग एवढा होता की अपघात झाल्यानंतर कल्पेश हा गाडीच्या बाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान तास-दिड तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कल्पेशचा मृत्यु झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading