तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी रुपये मंजूर

बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात झाली. बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी या तीर्थक्षेत्राला मिळाले नव्हते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामुळे तसंच मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुरावामूळे तीर्थक्षेत्र पोहोरदेवीला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे देशातील 14 कोटी बंजारा समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानत असल्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading