तंबाखूमुक्त महाराष्ट्रसाठी जिल्हास्तरावर जनजागृती

तंबाखू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे होणारे मृत्यू याविषयी जनजागृती करण्याकरिता कमिट टू क्वीटचं अनुपालन करण्यात येत आहे. तंबाखू कुठच्याही स्वरुपात प्राप्त करणे हानिकारक आहे. आत्तापर्यंत तंबाखू सेवन मुळे जगात ८० लाख लोक मृत्यूमुखी पावले आहेत. तंबाखूच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले की १९% पुरुष आणि २% महिला मिळून १०.७% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण ९९५ लाख प्रौढ लोक धूर असणार्‍या तंबाखू चे सेवन करतात आणि २९.६% पुरुष आणि १२.८% महिला मिळून २१.४% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण १९९४ लाख प्रौढ लोक धूर विरहित तंबाखूचे सेवन करतात. साधारणतः ४२.४% पुरुष आणि १४.२% महिला मिळून २८.६% संपूर्ण जनसंख्येच्या एकूण २६६८ लाख प्रौढ लोक एकूण धूर आणि धूर विरहित तंबाखूचे सेवन करतात. त्यांच्यापैकी ५४.४% लोक तंबाखू सोडण्याचा विचार करतांना आढळले. जागतिक आरोग्य संघटना दर वर्षी विविध प्रकारे तंबाखू विषयी जागतिक जनजागृती विषयी कथानक बनवत असते. यावर्षीचं कथानक कमिट टू क्वीट असे आहे. साधारण जनजागृतीसाठी लेक्चर घेणे, सेमिनार ठेवणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग ह्या माध्यमातून सरकारी आणि खाजगी शाळा तसंच कॉलेज मध्ये जनजागृती केली जाते. ठाणे जिल्हयात आत्तापर्यंत १४६ ट्रेनिंग सेशन्स मधून ८३९१ लोकांना ट्रेनिंग देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा नुसार विविध कार्यालयांमध्ये मौखिक कर्क रोगाचे निदान करण्याचे शिबीर राबवले गेले होते. ह्या शिबिरांमधून आत्तापर्यंत १२ कर्करोग रुग्णांचे निदान केले गेले. बदलापूर, मुरबाड, गोवेली, अंबाडीफाटा, खरडी येथील ग्रामीण रूग्णालयात, शहापूर, भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकांचे समुपदेशनाचे कार्यक्रम नियमितपणे करण्यात येते आणि तंबाखू ची सवय सोडण्याचे उपक्रम राबवले जातात. आत्तापर्यंत यामध्ये २७ हजार ७७० लोकांची नोंद झाली असून त्यापैकी १७५१ लोकांनी तंबाखूचे सेवन सोडलेले आहे. सध्या जिल्ह्यात १०७ शाळा ह्या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यानंतर या शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात तंबाखू सेवनाचे परिणाम आणि तंबाखू सेवनाने मनुष्य जीवनावर होणा-या परिणामाविषयी जनजागृती केली जाते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading