डोंबिवली पूर्व येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग

डोंबिवली पूर्व येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये आज भीषण आग लागली होती. आज दुपारी ३ च्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये आग लागली होती. मात्र सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान २, फायर वाहन आणि ३-वॉटर टँकर तसेच एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहचून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. साधारणत: तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या इमारतीमधील दुस-या मजल्यावर असलेल्या गोडावूनच्या मालाला आग लागली मात्र आगीचं कारण समजू शकलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading