डॉक्टर वा ना बेडेकर व्यवस्थापन संस्थेमुळे तेवीस विद्यार्थ्यांना प्रख्यात अशा आयसीआयसीआय बँकेत नोकरी

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉक्टर वा ना बेडेकर व्यवस्थापन संस्थेमुळे तेवीस विद्यार्थ्यांना प्रख्यात अशा आयसीआयसीआय बँकेत नोकरी मिळाली आहे. अलीकडे योग्य शिक्षण घेऊनही नोकरीची वानवा असते त्यामुळे त्यामुळे विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. विद्या प्रसारक मंडळाची डॉक्टर वा ना बेडेकर व्यवस्थापन संस्था असून या संस्थेतून विविध व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवले जात. या संस्थेतर्फे अलीकडेच तेवीस विद्यार्थ्यांना उपव्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये नोकरी मिळाली. बँकेच्या विक्री, सेवा तसेच इतर विभागात ही नोकरी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना सुमारे सव्वा चार लाख रुपयांचे पॅकेज मिळाल आहे. यासाठी संस्थेतर्फे अटीट्युड टेस्ट, ग्रुप इंटर्व्ह्यूज घेण्यात आले होते. सुमारे 46 विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी आपलं नशीब आजमावले होतं. यापैकी तेवीस विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. संस्थेतर्फे या 46 विद्यार्थ्यां मधून 39 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आणि त्यातील 23 विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली. यासाठी संस्थेतील महेश भानुषाली यांनी विशेष परिश्रम घेतले होते. हे यश संस्थेचा प्राध्यापक वर्ग, संस्थेचे संचालक, तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे मिळू शकलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading