ठाण्यामध्ये काल होळी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा होळीचा उत्साह जाणवत होता. शासनानं कोरोनाविषयक सर्व निर्बंध मागे घेतल्यामुळे यंदा होळी दणक्यात पण शांततेत साजरी झाली. ठिकठिकाणी होळी प्रज्वलित करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रोषणाई, पताका लावण्यात आल्या होत्या. सर्वत्र १० च्या आत होळी प्रज्वलित करण्यात आली. यंदा दहावी-बारावीची परीक्षा असल्याने फारसा डीजे, ढोल लावण्यात आले नव्हते. पण होळी मात्र दणक्यात साजरी करण्यात आली.