ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग

ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग लागली होती. सुदैवान कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मीरा रोड येथे राहणारे अनिल लोकरे हे कराडून मिरा रोड कडे येत असताना गायमुख नाक्याजवळ त्यांच्या गाडीला आग लागली. ही आग वेळीचं लक्षात आली आणि त्यांच्यासह गाडीत असलेल्या विजय लोकरे, दिलिप बामणे, कुसुम बामणे आणि लता कारंडे यांनी समय सुचकता दाखवत गाडीबाहेर धाव घेतली त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. शहर वाहतुक पोलिस. अग्निशामन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापक पथक यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. आणि अथक प्रयत्नांनी या गाडीच्या आगीवर नियंत्रण मिळवलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading