ठाण्यामध्ये काल ८ हजार ७९३ गौरी-गणपतींचं विसर्जन

ठाण्यामध्ये काल ८ हजार ७९३ गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामुळे काल गौरी-गणपतींचं विसर्जन होतं हीच गोष्ट लक्षात आली नाही. ना कुठे श्रीगणेशाचा जयजयकार, ना कुठे ढोलताशा, डीजेचा आवाज, ना कुठे रोषणाई, ना कुठे वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. सर्व ठिकाणी शांतपणे विसर्जन सुरू होतं. ठाण्यामध्ये काल ७ हजार ५५९ घरगुती, २८ सार्वजनिक आणि ७८५ गौरींचं विसर्जन झालं तर ७८५ गणेश मूर्तींचं स्वीकृती केंद्रामार्फत विसर्जन करण्यात आलं. रायलादेवी येथे सर्वाधिक म्हणजे १ हजार २७८ घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. उपवन तलाव येथे ९९५, मासुंदा तलाव येथे ८१६, दिवा घाट येथे ७५५ तर कोलशेत घाटावर ६८५ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading