ठाण्यामध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि कारचा अपघात

ठाण्यामध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि कारचा अपघात झाला. मात्र सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हुंदाई शोरूम जवळ नाशिक रोड कडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाचा आणि ट्रकचा अपघात झाला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून रस्त्यावर पलटी झाले आणि यामुळे झाडही पडले. तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येणारे वाहन हे अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्वरीत शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, नौपाडा पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही मात्र या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर संथ गतीने सुरू होती.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading