ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन मार्फत येत्या शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डुप्लिकेट टीम इव्हेंट पदध्तीने खेळविण्यात येतील. चार सदस्यांच्या संघासाठी रू. १०००/- तर प्रत्येक अतिरिक्त सदस्यासाठी रू. २५०/- प्रवेश शुल्क असणार आहे. या स्पर्धा सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आर्य क्रिडा मंडळ येथे खेळविण्यात येतील. स्पर्धेत प्रधम क्रमांकाने विजेता ठरणाऱ्या संघास रू ६०००/- रोख बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी व्हॉट्सअप च्या माध्यमातून अनिरूद्ध संझगिरी – ९८१९२६७४५७ / शरद गोरे – ९८३३७४९५३५ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
