ठाण्यात फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरुच

ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून काल शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील रिव्हरवूड पार्क मेन गेट आणि रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये अनधिकृत शेड तोडून ३ टपऱ्या, ३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकुम कशेळी रोडवरील हातगाड्यांवर कारवाई करून १७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हॉटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारुती रोड, तलावपाळी, स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका कोर्ट नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील वर्तकनगर नाका, रामचंद्र नगर, काजुवाडी या परिसरातील हातगाडी, फेरीवाले हटविण्यात आले. उथळसर प्रभाग समितीमधील फ्लॉव्हर व्हॅली, सर्व्हिस रोड, नारळीपाडा, पाचपाखाडी येथील पदपथांवरील ३ टप-या हटवून सामान जप्त करण्यात आल्या. वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून १३ हातगाडया, ४ लाकडी बाकडे, २ टप-या जप्त करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading