ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात

ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात झाल्या. गोकुळ नगर येथील नवनीत मोटर्स जवळ रस्त्यावरून जात असताना शेवरोलेट या चार चाकी गाडीला आग लागल्यामुळे रस्त्या शेजारी पार्क असलेल्या २ रिक्षांना आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. ही गाडी सकाळच्या सुमारास विमानतळावरून ठाण्यात येत होती. गोकुळनगर येथे आल्यावर या गाडीनं अचानक पेट घेतला. या रौद्र रूप धारण केलं. त्यामुळं या आगीची झळ बाजूलाच असलेल्या दोन रिक्षांना बसली आणि त्यात त्या भस्म झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. या आगीत शेवरोलेट बीट ही कार आणि सूर्यकांत मस्कर तसंच तबोली अहमद यांची रिक्षाही जळाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading