ठाण्यात तीन विविध अपघातात दोघे जखमी तर टेंपोचालक ठार

ठाण्यात आज एकाच दिवशी तीन विविध अपघातात दोघे जण जखमी आणि टेंपोचालक मृत्युमुखी पडल्याच्या घटना घोडबंदर रोड आणि मुंबई- नाशिक महामार्गावर घडल्या. याप्रकरणी कासारवडवली, चितळसर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पहिली अपघाताची घटना आज पहाटे नागला बंदर भागात घडली. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचालक मनिष यादव याने पाकींग लाईट बंद करून रस्त्यावरच ट्रक उभा केला होता. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भरधाव टेंपोची धडक उभ्या केलेल्या ट्रकला पाठीमागुन बसली. यात टेंपोच्या केबीनमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकल्याने टेंपोचालक मुनीर बेग याचा दुर्देवी मृत्यु झाला. याप्रकरणी, कासारवडवली पोलिसांनी ट्रकचालक यादव याला अटक केली आहे.
दुस-या घटनेत घोडबंदर रोडवरील सिनेमॅक्स समोर ओवळा येथे राहणारे सुनिल बेहरे हे व्यापारी दुचाकीवरून घरी जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात कंटेनरची धडक दुचाकीला बसुन गंभीर जखमी झाले. तर तिसऱ्या घटनेत कळवा येथे राहणारा शिवकुमार विश्वकर्मा हा गुरुवारी सायकलवरून माजीवडयाच्या दिशेने चालला असताना मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत पुलाजवळ अज्ञात वाहनाची धडक सायकलला बसुन विश्वकर्मा जखमी झाला. याप्रकरणी,कापुरबावडी पोलीस ठाण्यात पसार झालेल्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading