ठाण्यात जोरदार पाऊस – आज दिवसभरात ८६.८२ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यात आज सकाळपासूनच जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम ठाण्यातही चांगला जाणवला असून दुपारपासून तर पुन्हा पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला असून ऐन उन्हाळ्यात या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ८.३० पर्यंतच्या गेल्या २४ तासात ९.१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३० या एक तासात १४.१७ मिलीमीटर पाऊस झाला. सकाळी ११.३० ते १२.३० या एक तासामध्ये ५.८ मिलीमीटर तर दुपारी दीड ते अडीच या एक तासात तब्बल २०.५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर आज दिवसभरात एकूण ८६.८२ मिलीमीटर पाऊस पडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading