ठाण्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून गेल्या २४ तासात ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानं कालच जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही वेळ गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. ठाण्यात सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसामुळं हवेत मात्र सुखद गारवा निर्माण झाला आहे.