ठाण्यात कालपासून सोसाट्याचा वारा – अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या

गेले दोन दिवस ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा वाहत असून यामुळे तीव्र उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना या वा-यामुळे सुखद गारवा मिळाला. काल संध्याकाळपासून ठाण्यात अनेक ठिकाणी जोरदार वारा वाहत आहे. काल आणि आज सकाळी काही ठिकाणी पावसानंही हजेरी लावली. आज सकाळपासून तर ठिकठिकाणी सुटलेल्या जोरदार वा-यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत तर शहराच्या विविध भागात झाडाच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. या वा-यामुळे जिवितहानी झाली नसली तरी काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाहनांचंही नुकसान झालं आहे. काल ७ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या होत्या तर आज दुपारपर्यंतच १० ते १५ ठिकाणी झाडं पडून वाहनांचं नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading