ठाण्यातील १२०० हून अधिक डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाविरोधात एक दिवसाचा पाळला बंद

ठाण्यातील १२०० हून अधिक डॉक्टरांनी काल शासनाच्या निर्णयाविरोधात एक दिवसाचा बंद पाळला. कालच्या देशव्यापी बंदमध्ये ठाण्यातील हे डॉक्टर सहभागी झाले होते. शासनानं पदव्युत्तर आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिली आहे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास १०० हून अधिक डॉक्टरांनी या निर्णयाविरोधात निदर्शनं करून आपला निषेध व्यक्त केला. या डॉक्टरांनी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवले होते. ज्यांना अभ्यासक्रमामध्ये शस्त्रक्रिया शिकवल्या नाहीत त्यांनी शस्त्रक्रिया करणे म्हणजे रूग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचं सांगत डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. जिल्ह्यामध्ये जवळपास २०० रूग्णालयं आणि ३०० दवाखाने असून हे सर्वजण या बंदमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading