ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आग

ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आज सकाळच्या सुमारास आग लागली होती. चरई मधील गणेश चित्रपटाच्या बाजूला माऊली मंडळाची शाळा
आहे. या शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या संगणक कक्षात सकाळच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बरच नुकसान झाल्याचे सांगितले
जाते. ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्वरीत धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवल. याआगी मुळे मोठा धूर निर्माण झाला होता. यामुळे काहीशी घबराट
निर्माण झाली होती. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे या संगणक कक्षात कोणी नव्हतं त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading