ठाण्यातील कॅप्टन जयराज नाखवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

ठाण्यातील कॅप्टन जयराज नाखवा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कॅडेट ते कॅप्टन आणि शिक्षक ते प्रशिक्षक असा गेल्या साडे पाच दशकांचा प्रवास यामागे होता. कॅडेट, थर्ड ऑफिसर, चीफ ऑफिसर अशी चढती कमांड ठेवणाऱ्या जयराज नाखवा यांनी मर्चंड नेवीत कारर्कीद घडवण्याच देह बाळगलं होतं. शालेय जिवनात स. वि. कुलकर्णी आणि मेजर बापट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मेरी टाईम एज्युकेशन ट्रेनिंग इनस्टीट्युट असोसिएशन तर्फे देण्यात आलेला जिवन गौरव स्विकारल्या नंतर वयाच्या ७२ व्या वर्षी आपल्यातला कॅडेट जागृत आहे हेच यशाचं गमक असल्याचं जयराज नाखवा यांनी सांगीतलं. त्यांनी कॅडेटसला केंद्रस्थानि ठेवून लिहीलेल पुस्तकही गाजत आहे. त्यांचे अनेक कॅडेट मर्चंड नेवित कार्यरत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading