ठाण्यातील कापुरबावडी नाका येथील नाका शाळेत बांधकाम मजुरांच्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण होणार

ठाण्यातील कापुरबावडी नाका येथील नाका शाळेत बांधकाम मजुरांच्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. महारेरा कडून प्रशिक्षक प्रशिक्षित करण्यासाठी ३ केंद्रांची निवड करण्यात आली असून त्यात ठाण्यातील नाका शाळेची निवड करण्यात आली आहे. महारेरा, नॅसकॉम, एमसीएचआय, ठाणे महापालिका, रूस्तमजी ग्लोबल करिअर इन्स्टीट्यूट आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम मजुरांना प्रशिक्षित करणा-या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण या नाका शाळेत होणार आहे. काल शिवजयंतीच्या मुहुर्तावर या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. येत्या सोमवारपासून या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रावर पेंटींग, टाईलिंग, इलेक्ट्रिशियन, मेस्त्रीकाम, बार वेडींग अशा विविध क्षेत्रातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बांधकाम व्यावसायिक आपल्या स्वत:कडे काम करत असलेल्या किमान ३० जणांना या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण देण्यासाठी पाठवणार आहेत. प्रशिक्षणानंतर हे प्रशिक्षक इतर मजुरांना प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading