ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी तर कोपरी परिसरात गुरूवारी पाणी नाही

ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे. तर कोपरी परिसरात उद्या २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार २७ मे सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा बंद राहील. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
तसंच कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने उद्या सकाळी ९ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट आणि कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading