ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी २४ तास बंद

ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे.
ठाणे महापालिकेच्या पिसे येथील राँ वाँटर पंपिग स्टेशन मध्ये वाढीव क्षमतेचे पंपिग मशीन बसविण्याचे काम चालू असून या प्रकल्पातील दुसरा पंप चालू करणे आणि त्या अनुषंगाने इतर कामे करण्यात येणार आहेत. यासाठी स्टेम प्राधिकरणाने देखभाल दुरूस्ती तसेच महत्वाच्या कामाकरिता शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट,समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जेल, जाँन्सन, इटरनिटी, ब्रह्मांड, विजयनगरी, बाळकूम, कोलशेत, आझादनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, रूस्तमजी या भागात तसेच कळवा- मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading