ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. स्टेम वॉटर डिस्ट्री.अँण्ड इन्फा.कं. प्रा.लि. यांच्याकडुन होणारा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर, जेलटाकी, ऋतुपार्क, साकेत आणि मुंब्रा या भागात सुरु राहणार आहे. तसेच बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading