ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची अखेर बदली

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची अखेर बदली झाली आहे. फणसळकर यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या पदावर झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गेले काही दिवस फणसळकर यांची बदली होणार अशी जोरात चर्चा होती. त्यानुसार आज त्यांची बदली झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदी अजून कोणाची नियुक्ती झालेली नाही पण जगजितसिंग यांचं नाव चर्चेत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading