ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. आता जयजीत सिंग यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकाने सचिन वाझेच्या साथीदारांना जयजीत सिंग यांच्या नेत्रृत्वात अटक केली होती. सचिन वाझे याला गुजरातमधून सिमकार्ड देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एटीएसच्याच पथकाने अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आता जयजित सिंग यांची बदली करण्यात आली आहे. तर विनित अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदावर कुणाची वर्णी लागणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यात जयजीत सिंग यांच्या नावाचाही समावेश होता. अखेर आता त्यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading