ठाणे शहराला पुढील दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार

ठाणे शहराला पुढील दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. पिसे परिसरात होणा-या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीतील पुराच्या पाण्याबरोबर पानवेली आणि नदीतील गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्टेनरमध्ये अडकल्यानं पंपाचा फ्लो कमी झाला आहे. त्यामुळं पिसे येथून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यानं शहरातील सर्व भागात पुढील दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं पाणी पुरवठा विभागानं कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading