ठाणे शहराला पुढील आठवडाभर होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

भातसा नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती उद्या पासून ९ डिसेंबर पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार असून या कालावधीत ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.

न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात येणार असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली जाणार आहे. यामुळे मा कालावधीत ठाणे महानगरपालिकेला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याने शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नौपाडा-कोपरी, टेकडी बंगला, किसननगर आणि हाजुरी या परिसरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading