ठाणे शहरात घरोघरी ताप तपासणी करण्यावर भर- प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे, शिबीरांच्या माध्यमातून तपासणी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली असून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकांच्या माध्यमातून तसेच आरोग्य शिबीराच्या माध्यमातून ताप तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान या तपासणीमध्ये काही व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने महापालिका क्वारंटाईन सेंटर्समध्ये स्थलातंरित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत खारटन रोड येथील बीएसयुपीच्या एक ते सहा इमारतींमध्ये घरोघरी जावून ताप तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर विष्णूनगर, घंटाळीदेवी मैदान तसंच लोकमान्यनगर येथे प्रभाग क्रमांक 6 मध्येही मोबाईल व्हॅन क्लिनीकच्या माध्यमातून ताप तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसंच कळवा प्रभाग समितीतंर्गत सूर्यनगर आणि विटावा गाव, वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत शिवाईनगर, म्हाडा कॅालनी आणि धर्मवीरनगर, उथळसर प्रभाग समितीमध्ये सिद्धेश्वर तलाव, गोकुळ नगर, राबोडी, पंचगंगा, साईनाथनगर आणि पाचपाखाडी या ठिकाणी ताप शिबीर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसंच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत साईनाथ नगर, शिवाजी नगर, पातलीपाडा, ढोकाळी गाव या ठिकाणी घरोघरी जावून ताप तपासणी करण्यात आली त्याचबरोबर या चारही ठिकाणी ताप तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading