ठाणे वाहतूक शाखेतर्फे एका रोबोट द्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाणार

ठाणे वाहतूक शाखेतर्फे एका रोबोट द्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाणार आहे. मुलांमध्ये वाहतूक नियमांची जागृती होण्यासाठी हा अभिनव उपक्रम वाहतूक शाखेतर्फे राबवला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या या रोबोटमध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. स्पीकर, एलसीडी डिस्प्ले याद्वारे हा रोबोट वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणार आहे. वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे आपला जीव कसा वाचू शकतो यापासून हेल्मेट वापरणे आणि कार चालकांना सीट बेल्ट लावण्याविषयी तो माहिती देणार आहे. मुलांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्व आणि वाहतूक चिन्हांची ओळख हा रोबोट करून देणार आहे. ठाण्यातील मेकर्स लॅबच्या वैद्य यांनी या रोबोटची निर्मिती केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading