ठाणे वार्तानं ११ लाखांच्या हिटस् चा टप्पा केला पार

ठाणे वार्तानं ११ लाखांच्या हिटस् चा टप्पा पार केला आहे. ठाणे वार्ताच्या दृष्टीने ही एक अनमोल बाब आहे. जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील आणि ११ लाखांचा टप्पा पार करणारी बहुधा ठाणे वार्ता हे एकमेव संकेतस्थळ असावं. विश्वासार्हता आणि अचूक बातम्यांच्या जोरावरच आम्ही कुठल्याही प्रकारचे हिटस् विकत न घेता हा टप्पा ओलांडला आहे. ठाणे वार्ता हे ठाण्यातले सर्वात जुने आणि लोकप्रिय दृकश्राव्य माध्यम असून जिल्ह्यात ठाणे वार्ताला आत्तापर्यंत सर्वात जास्त पसंती आणि लोकप्रियता मिळाली आहे. एखादं व्रत घेतल्याप्रमाणे आमची ही सेवा अव्याहतपणे सुरू आहे. नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन आणि नव्या जुन्याची सांगड बांधत आम्ही सतत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलो आहोत. कोरोनाच्या काळातही सर्वात वेगवान आणि अचूक
बातम्यांचा शिरस्ता कायम असल्यामुळेच लोकं ठाण्यातल्या बातम्यांसाठी ठाणे वार्ता संकेतस्थळाला आवर्जून भेट देत असतात. आमच्या या यशात आमच्या सहका-यांचा सहभागही तितकाच महत्वाचा असून त्यामुळेच आम्ही डिजीटल माध्यमांमध्येही पुढे आहोत. आम्हांला आत्तापर्यंत मिळालेल्या दर्शकांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही इथवर पोहचलो असून दर्शकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading