ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं फेटाळली हावरे कुटुंबियांची ६० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केलेला ६० कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला आहे. स्वत:च्या चुकीमुळे झालेल्या अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळू शकत नाही असं मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी म्हटलं आहे. उज्ज्वला हावरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोटार अपघात प्राधिकरणाकडे हा नुकसान भरपाईचा दावा केला होता. ८ मे २००५ मध्ये सतिश हावरे हे आपल्या वाहनानं आणखी एका बरोबर जात असताना समोरून येणा-या एका ट्रकनं दिलेल्या धडकीमुळे झालेल्या अपघातात गाडीतील दोघेही ठार झाले होते. ट्रकच्या ड्रायव्हरनं आपण ट्रक योग्यरितीने चालवत होतो त्यामुळं आपल्याकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचा दावा केला. न्यायमूर्तींनीही आपल्या निकालामध्ये अपघाताच्या ठिकाणी कारमधील व्यक्तींनी हा अपघात टाळण्यासाठी काही प्रयत्न केले असं दिसलं नसल्याचं म्हटलं. कारला ट्रकने डाव्या साईडला धडक दिल्याचं दिसत असल्यानं कार ही डाव्या बाजूने होती आणि तिची ट्रकला धडक बसली. अपघात झाल्यानंतरच्या पंचनाम्यातही अपघात हा कारच्या चालकामुळेच झाल्याचं दिसून येतं. ड्रायव्हर आणि क्लीनर अपघात झाल्यानंतर पळून गेले म्हणजेच ड्रायव्हरची चूक होती असं होऊ शकत नाही. त्यामुळं त्याला या अपघातास जबाबदार ठरवता येत नाही. आरोपपत्र जरी ड्रायव्हरच्या विरोधात असलं तरी ड्रायव्हरचा निष्काळजीपणा यात दिसत नाही. त्यामुळं कारचे चालक हेच या अपघातास जबाबदार असून स्वत:च्या चुकीसाठी कोणत्याही नुकसान भरपाईस पात्र ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे अर्जदार हे ट्रक चालकाचा निष्काळजीपणा सिध्द करू शकले नाहीत त्यामुळं न्यायालयानं हा नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading