ठाणे, मुंबईमध्ये गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळं चाकरमान्यांचे चांगलेच हाल

ठाणे, मुंबईमध्ये गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. रेल्वे रूळांवर पाणी आल्यामुळे उपनगरीय सेवा बंद पडल्यानं प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली. सकाळी कामावर आलेले चाकरमानी संध्याकाळी घरी परतण्यासाठी म्हणून बाहेर पडले असता विविध रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. आधीच जोरदार पाऊस त्यातच रखडलेल्या उपनगरीय गाड्या यामुळे प्रत्येक प्रवासी मिळेल ते गाडी पकडण्यासाठी धडपडत होता. यामुळं अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीचे प्रकार झाले. घाटकोपर रेल्वे स्थानकातही असाच प्रकार घडला. ठाणे वार्ताचे एक प्रेक्षक दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानचे आदेश चौधरी यांनी घाटकोपर स्टेशनवर सव्वा पाचच्या सुमारास झालेल्या प्रवाशांच्या चेंगराचेंगरीच्या घेतलेल्या व्हीडीओत प्रवाशांची घरी जाण्यासाठी होत असलेली धडपड दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading