ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्र पोलीस संघ तर महिला गटात ठाणे महापालिकेचा संघ विजयी

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्र पोलीस संघ तर महिला गटात ठाणे महापालिकेचा संघ विजयी ठरला आहे. विजेत्या संघांना प्रत्येकी १ लाख रूपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. व्यावसायिक पुरूष संघात द्वितीय पारितोषिक एअर इंडियानं पटकावलं असून त्यांना ७५ हजार रूपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं. महिंद्र अँड महिंद्र, भारत पेट्रोलियम यांना उपविजेतेपदासाठीचे ३० हजार रूपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. एअर इंडिया संघातील उमेश म्हात्रे याची सर्वोत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघातील बाजीराव घोडके यांची उत्कृष्ट पकड, उदयोन्मुख खेळाडूचा किताब ठाणे महापालिका संघातील अक्षय भोईर तर मालिकेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे २१ हजार रूपयांचं पारितोषिक महाराष्ट्र पोलीस संघातील नितीन खळे यांनी पटकावलं. महिला व्यावसायिक गटात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बँक ऑफ बडोदा, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विजय एमरल्ड आणि बालवडकर पाटील चेंबर्स यांनी पटकावले. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक साक्षी रहाटे, उदयोन्मुख खेळाडूचा किताब ज्योती पवार तर मालिकेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ठाणे महापालिकेच्या कुमुद देवकरची निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या महिला संघानं प्रथमच या स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद पटकावल्यानं या महिला संघाला महापौरांनी २५ हजार रूपयांचे, उपमहापौरांनी ११ हजारांचे तर सभागृह नेते आणि शिक्षण समिती सभापतींनी संयुक्तरित्या २१ हजार रूपयांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading