ठाणे महापालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा

भेटला ना कुणी सोबती ना सखा आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तयाचा, येथे वेळ कुणा कवटाळणा दु:खा या कवितेच्या ओळीप्रमाणे आपल्या अंधत्वावर मात करत आपल्या समधुर आवाजानं आणि जादुई बोटाच्या वाद्य वादनानं सादर झालेल्या सांगितिक मैफलीनं ठाणे महापालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त धर्मवीर आनंद दिघे शाळा या विशेष शाळेतील आणि ठाणे महापालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुलांच्या मनोरंजनासाठी आदित्य प्रतिष्ठान, दिव्यांग कला केंद्र प्रस्तुत अरेरे ते अरेवा या किरण नाकती यांनी दिग्दर्शित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे जन्मत:च अंध असलेल्या गायक-वादक कलाकारांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. मराठी हिंदी गीतांसोबतच वादन आणि नृत्य अशा विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading