ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री ८ वाजल्यासून संचारबंदी

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेनं आज रात्री ८ वाजल्यापासून ठाण्यात संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील १५ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात १४४ कलम लागू करण्यात आलं असून अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम बंद राहतील. जीवनावश्यक श्रेणीत येणा-या सेवा आणि व्यवहार सकाळी ७ ते रात्री ८ या वा वेळात सुरू राहतील. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तीक निगारक्षक यांच्या सेवा सुरू राहतील. रूग्णालयीन सेवा, लसीचे उत्पादन, किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला, फळं, दूध डेअरी, बेक-या आणि खाद्यपदार्थांची दुकानं सुरू राहतील. प्राण्यांसंबंधी सेवा, शीतगृहं आणि सार्वजनिक वाहतूक सुरू राहील. दूरसंचार सेवा, वस्तूंची वाहतूक, पाणी पुरवठा विषयक कामं, शेतीची कामं, मान्सून पूर्व कामं, आयात-निर्यात व्यवहार, अधिकृत मिडिया, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सरकारी-खाजगी सुरक्षा रक्षक सेवा, क्लाऊड सेवा, विद्युत तसंच गॅस पुरवठा, एटीएम, टपालसेवा, लॉण्ड्री, विद्युत उपकरणं दुरूस्ती सेवा सुरू राहतील. जीवनावश्यक सेवांच्या दुकानांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सामाजिक अंतर पाळणे, मालक तसंच काम करणा-या सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर करून घेणे, पारदर्शक काचेचा वापर आवश्यक आहे. नियमांचा भंग करणा-या ग्राहकांना आणि दुकानदारांना दंड करण्यात येणार आहे. दुकानांमध्ये गर्दी होत असेल किंवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असलेली दुकानं यांचा वेळोवेळी अभ्यास करून वेळा बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जी दुकानं सद्यस्थितीत बंद आहेत त्यांनी सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणा-या प्रवाशांना मास्क नसेल तर दंड आकारण्यात यावा. रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स बंद राहतील फक्त होम डिलीव्हरीसाठी परवानगी असेल. होम डिलीव्हरी करणा-या सर्व कर्मचा-याचं लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय नियमांचे पालन करून सुरू राहतील. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ त्या स्थळी खाण्यास परवानगी नसेल. वर्तमानपत्र तसंत नियतकालिकांची छपाई तसंच प्रसिध्दी करण्यास परवानगी आहे. सर्व सिनेमागृह, नाट्यगृह आणि सभागृह, शॉपिंग मॉल्स, वॉटर पार्क, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, चित्रपट, मालिका तसंच जाहिरातीचे शूटींग बंद राहील. सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर्स, सर्व शाळा, महाविद्यालयं, सर्व खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह केस असतील तर ती संस्था सूक्ष्म कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येईल.अशा सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीबाहेर माहिती बोर्ड लावून अभ्यागतास प्रवेश नाकारावा अशा सूचना महापालिकेनं जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading