ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाण्यात सध्या कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्णांची संख्या अधिक आहे अशा विभागांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.