ठाणे महापालिका आयुक्त उद्या फेसबुक लाईव्ह द्वारे ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता पालिका आयुक्त विजय सिंघल ठाणेकरांशी थेट संवाद साधणार आहेत. ठाण्यातील कोरोना संबंधित माहिती तसंच लॉकडाऊन ५ बद्दल ठाण्यातील माहिती ते यावेळी देणार आहेत. नागरिकांनी आपले प्रश्न http://bit.ly/LIvEM या लिंकवर विचारावेत. DigiThane या फेसबुक पेजवरून उद्या दुपारी १२ वाजता आयुक्त लाईव्ह येणार आहेत.