ठाणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर

ठाणे महानगरपालिकेच्या सन -2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 13 मे, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरची अधिसूचना महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर, महापालिका मुख्यालय सूचनाफलक आणि सर्व प्रभाग समिती कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र.रानिआ / मनपा 2021 / प्र.क्र .13 / का.-5, दिनांक 10 मे 2022 अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या सन -2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना, नकाशा ( शहराचा एकत्रित नकाशा ) व सर्व परिशिष्टे ( 1 ते 9 ) ठाणे महानगरपालिकेच्या सूचना संकेत स्थळावर ( https://thanecity.gov.in ) महापालिका मुख्यालय सूचनाफलक आणि सर्व प्रभाग समिती कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading