ठाणे पोलीस दलातील आत्तापर्यंत ८ पोलीसांचा कोरोनाने मृत्यू

ठाणे पोलीस दलाला कोरोनाचा विळखा कायम असुन आतापर्यत आठ पोलिसांचा कोरानामुळे मृत्यु ओढवल्याने चिंता व्यक्त होत आहे. आज पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपाई किशोर शिंदे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात गेले तीन महिने पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यातील अनेक योद्धयांनी कोरोनावर यशस्वी मात केली असली तरी ठाणे पोलीस दलातील आत्तापर्यंत ८ पोलीसांचा कोरोनाने बळी गेला आहे. आत्तापर्यंत श्रीनगर पोलीस ठाण्यातील प्रतिभा गवळी, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सशिराम गिरी, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिलीप अहिरे, चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सतिश देसाई, कासारवडवली पोलीस ठाण्यातील हवालदार विश्वनाथ धुर्वे, विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशोक पाटील, हिललाईन पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप घोडके यांचं कोरोनामुळे निधन झालं तर पोलीस मुख्यालयातील किशोर शिंदे यांचा आज उल्हासनगरमधील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading