ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होणार

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब टेस्ट तपासणी होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटना, देश अपनाये आणि एमसीएचआय यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीसांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पोलीसांवर गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड ताण पडत आहे. त्यातच कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस कर्मचारी-अधिका-यांना कोरोनाची लागणही झाली. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे. काल ठाणे पोलीस आयुक्तालयात या आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ३६५ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली. ही आरोग्य तपासणी १० जुलै पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलीस दल, रॅपीड अॅक्शन फोर्स, होमगार्ड असे मिळून ४१४ अधिकारी-कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातून ३१३ पोलीस बरे झाले असून १०१ पोलीस उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत ठाणे शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचा-यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading