ठाणे पोलीसांनी अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबा यांना ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा गांधींविरूध्द अनुद्गार काढल्याबद्दल कालीचरण बाबा आणि त्यांच्या काही सहका-यांविरूध्द नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. वर्धा पोलीसांनी कालीचरण बाबांना अटक केली असून कालीचरण बाबांना न्यायालयानं पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळं नौपाडा पोलीसांनी ट्रान्सफर वॉरंट द्वारे रायपूर जेलमधून कालीचरण बाबांना ताब्यात घेतलं आहे. आज रात्रीपर्यंत त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात आणलं जाईल असं पोलीसांतर्फे सांगण्यात आलं.